१० ते १७ सप्टेंबरदरम्यान जात प्रमाणापत्रांसाठी विशेष शिबिरे
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
शिंदे समितीने शोधलेल्या सुमारे ५८ लाख मराठा-कुणबी नोंदी आता ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना तातडीने दाखले मिळावेत यासाठी १० ते १७सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे स्पष्ट निर्देश मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी लोणी येथून धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हानिहाय देण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्रांची संख्या, कुणबी नोंदी तसेच
साडेतीन लाख प्रमाणपत्रांचे वितरण
मराठवाड्यात आतापर्यंत साडेतीन लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. वंशावळ आणि कायदेशीर नियमांचे पालन करूनच कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर चौकटीत सोडविण्याची सरकारची भूमिका असून, पात्र लाभार्थीना त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री
प्राप्त झालेल्या अर्जाचाावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची तसेच अंमलबजावणीची सविस्तर माहिती सादर केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














